भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:53 PM2024-10-25T13:53:32+5:302024-10-25T13:55:14+5:30

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ४ मतदारसंघांत ९ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 17 applications of 9 candidates filed in Ratnagiri district including Bhaskar Jadhav, Kiran Samant, Yogesh Kadam  | भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल 

भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल 

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ४ मतदारसंघांत ९ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. मात्र, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून माजी आमदार संजय कदम आणि महायुतीतून आमदार योगेश कदम यांनी प्रत्येकी १ अर्ज भरला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून आमदार भास्कर जाधव यांनी २ अर्ज भरले आहेत. 

चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून प्रशांत यादव आणि स्वप्ना प्रशांत यादव यांनी प्रत्येकी ३ अर्ज भरले आहेत. तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतून किरण सामंत यांनी ३, महाविकास आघाडीतून राजन साळवी यांनी २ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व यशवंत हर्यान यांनी अपक्ष म्हणून प्रत्येकी एक अर्ज भरला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 17 applications of 9 candidates filed in Ratnagiri district including Bhaskar Jadhav, Kiran Samant, Yogesh Kadam 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.