गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:18 PM2024-11-14T17:18:03+5:302024-11-14T17:18:59+5:30

गुहागर : उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप गुहागर मतदारसंघात काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A fight between Mahayuti's Rajesh Bendal and Mahavikas Aghadi's Bhaskar Jadhav In Rajapur Constituency | गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

गुहागर : उमेदवारीसाठी आग्रही असलेली भाजप गुहागर मतदारसंघात काय भूमिका घेणार, यावर खूप काही ठरणार आहे. येथील जागा शिंदेसेनेला गेल्यामुळे भाजपने आधीपासूनच नाराजीची झेंडा फडकावला होता. दरम्यान, आजवर पाचवेळा आमदार झालेले भास्कर जाधव सहाव्यांदा जिंकून जिल्ह्यात सर्वाधिकवेळा आमदार होण्याचा विक्रम करणार की, यावेळी त्यांचा रथ महायुती अडवणार, हे पुढील आठवड्यावर ठरेल.

अनेक वर्षे गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. येथे शिवसेनेची ताकदही मोठी आहे. त्यामुळे २००९ पर्यंत बहुतांशवेळा हा मतदारसंघ युतीकडे होता. मात्र २००९ साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि येथील राजकीय समीकरणे बिघडली. त्यावर्षी शिवसेनेकडून रामदास कदम आणि भाजपकडून अपक्ष म्हणून विनय नातू यांनी ही निवडणूक लढवली आणि चिपळूणहून गुहागरला गेलेले भास्कर जाधव पहिल्यांदा विजयी झाले. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुका ते विजयी झाले. दोन निवडणुका राष्ट्रवादीकडून तर २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. २००९ आणि २०१४ मध्ये नातू आणि जाधव आमनेसामने होते. जाधव यांनी नातूंना पराभूत केले.

आता महायुतीत भाजपला ही जागा हवी होती. मात्र ती शिंदेसेनेला मिळाली आणि राजेश बेंडल येथे निवडणूक लढवत आहेत. आता नाराजी सोडून भाजपने त्यांच्यासाठी काम केले तर शिंदेसेनेला फायदा आणि काम नाही केले तर भास्कर जाधव यांना फायदा होईल, अशी भाजपची स्थिती आहे. त्यामुळे गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भास्कर जाधव यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मात्र राजेश बेंडल यांचे समाजातील कामही मोठे आहे. आता मतदार कय ठरवतात, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.

 

  • भास्कर जाधव यांना विजय मिळाला तर ते सहाव्यांदा आमदार होतील आणि जिल्ह्यासाठी तो विक्रम असेल.
  • राजेश बेंडल यांना विधानसभेचा अनुभव नसला तरी कुणी समाजाच्या विकासासाठी त्यांनी खूप काम केले आहे.
  • भाजपची भूमिका हा येथील कळीचा मुद्दा ठरणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A fight between Mahayuti's Rajesh Bendal and Mahavikas Aghadi's Bhaskar Jadhav In Rajapur Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.