रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान 

By मनोज मुळ्ये | Published: November 20, 2024 12:51 PM2024-11-20T12:51:33+5:302024-11-20T12:56:07+5:30

रत्नागिरी : नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Enthusiastic start to polling in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान 

रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान 

रत्नागिरी : नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदान करुन प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात तब्बल २२ उमेदवार अपक्ष आहेत. जिल्ह्यातील रत्नागिगरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र आहे. केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी झाली असल्याने तेथील लढत तिरंगी होत आहे.

राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दापोली मतदारसंघामध्ये १८.३२, गुहागरमध्ये १७.०५, चिपळूणमध्ये २४.५७, रत्नागिरीत १८.८० तर राजापुरात २४.०७ टक्के मतदान झाले आहे.

मंत्री उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांनी पाली येथे पहिल्या टप्प्यातच मतदान करुन मतदारसंघाचा दौरा सुरू करुन आढावा घेण्यास सुरुवात केली आह. मंत्री उदय सामंत यांनी प्रथम रत्नागिरी शहरातील अनेक बूथना भेट दिली आणि त्यानंतर ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Enthusiastic start to polling in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.