..म्हणून उदय सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Published: October 25, 2024 07:20 PM2024-10-25T19:20:19+5:302024-10-25T19:21:17+5:30

गद्दारी करणा-यांना पाडा : रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 So Uday Samant entry into BJP stopped, Minister Ravindra Chavan secret blast | ..म्हणून उदय सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गौप्यस्फोट

..म्हणून उदय सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : ज्यांना उमेदवारी देण्यासाठी उदय सामंत यांना पक्षात घेता आले नाही, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे अशा गद्दारांना पाडा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी असा महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी उमेदवार उदय सामंत, किरण सामंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

२०१४ साली उदय सामंत यांना भाजपमध्ये येणार होते. मात्र त्यावेळी बाळ माने हे पक्षाचे उमेदवार असल्याने सामंत यांचा भाजप प्रवेश थांबला. ज्यांच्यासाठी भाजपने सामंत यांचा प्रवेश थांबवला, त्यांनीच आता गद्दारी केली आहे. सर्वांनी एएकत्र येऊन अशा गद्दारांना पाडायला हवे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 So Uday Samant entry into BJP stopped, Minister Ravindra Chavan secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.