वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:28 PM2020-10-13T17:28:23+5:302020-10-13T17:30:33+5:30
mahavitaran, coronavirus, ratnagirinews लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. वीजबिल माफीसाठी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. मात्र, वीजग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत यांनी रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. वीजबिल माफीसाठी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. मात्र, वीजग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत यांनी रत्नागिरी येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
लॉकडाऊन कालावधीतील वीजबिल माफी मिळावी या मागणीसाठी मनसेतर्फे पाठपुरावा सुरू आहे. वीज ग्राहकांना व्याजासह वीजबिले देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सप्टेंबरमध्ये बेमुदत उपोषण पुकारले होते. आंदोलनादरम्यान स्थानिक पोलीस प्रशासनाने घडवून आणलेल्या चर्चेदरम्यान संबंधित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले होते.
यावेळी महावितरणतर्फे उपकार्यकारी अधिकारी संगमेश्वर यांनी चर्चा करताना वीजबील माफी किंवा जमीनदार शेतकरी यांना भाडे व नुकसान भरपाई देणे, सध्याच्या बिलात आलेले व्याज रद्द करण्यात यावे, या प्रमुख मुद्यावर आठ दिवसात बैठक बोलावून संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक प्रस्ताव कंपनीच्या मुख्य कार्यालय व शासन दरबारी दाखल करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, वीजबिल माफी व अन्य मागण्यांबाबतीत कार्यवाही न झाल्याने मनसेने उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रूपेश सावंत, शहराध्यक्ष सतीश राणे यांच्यासह रूपेश जाधव, राजापूरचे तालुकाध्यक्ष राजू पवार, राज्य परिवहन कामगार सेनेचे सुनील साळवी, उपशहराध्यक्ष सिध्देश धुळप, अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके उपोषणात सहभागी झाले आहेत.