महावितरणकडून रत्नागिरीतील ४६५ ग्राहकांना प्रकाशाची ‘दिवाळी भेट’

By मेहरून नाकाडे | Published: November 13, 2023 06:01 PM2023-11-13T18:01:38+5:302023-11-13T18:02:34+5:30

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी 'प्रत्येक घरी दिवा - प्रत्येक घरी दिवाळी' हा संकल्प केला होता. त्यानुसार ...

Mahavitaran gave the gift of light on Diwali by providing new electricity connections to 465 consumers in Ratnagiri district | महावितरणकडून रत्नागिरीतील ४६५ ग्राहकांना प्रकाशाची ‘दिवाळी भेट’

महावितरणकडून रत्नागिरीतील ४६५ ग्राहकांना प्रकाशाची ‘दिवाळी भेट’

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी 'प्रत्येक घरी दिवा - प्रत्येक घरी दिवाळी' हा संकल्प केला होता. त्यानुसार महावितरणनेरत्नागिरी जिल्ह्यातील ४६५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन दिवाळीला प्रकाशाची भेट दिली आहे.

दिवाळी म्हणजे दीपांचा, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला. प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, या भूमिकेतून मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. अधीक्षक अभियंता स्वप्निल काटकर (रत्नागिरी मंडल) यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित जबाबदारी सर्व विभागीय कार्यकारी अभियंता व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेत नियोजन केले होते. महावितरण मुख्यालयाकडून आवश्यक वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले.

ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी कामास सुरूवात केली. सलग १५ दिवस सातत्यपूर्ण परिश्रमातून रत्नागिरी जिल्ह्यात ४६५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन प्रकाशाचे नाते जपले. अस्तित्वातील विद्युत यंत्रणेतून रत्नागिरी जिल्ह्यात ३४६ ग्राहकांना आणि नवीन विद्युत यंत्रणा उभारणी करुन रत्नागिरीत जिल्ह्यात ११९  ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Mahavitaran gave the gift of light on Diwali by providing new electricity connections to 465 consumers in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.