महावितरण आॅनलाईन वीजबिल सेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:34 PM2018-09-15T14:34:06+5:302018-09-15T14:35:29+5:30
महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली महावितरणची आॅनलाईन वीजबिल भरणा सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दरम्यान या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणा दिनांक ची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार आहे.
रत्नागिरी : महावितरणच्यामुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली महावितरणची आॅनलाईन वीजबिल भरणा सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दरम्यान या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणा दिनांक ची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार आहे.
महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ८ सप्टेंबरपासून ग्राहकांना आॅनलाईन वीजबिल भरणा करण्यात अडचणी येत होत्या. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असून, वीजग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अॅप व इतर आॅनलाईन सेवाद्वारे वीजबिल भरता येईल.
सर्व्हर बंद असल्याच्या काळात ज्या ग्राहकांची गैरसोय झाली आहे, त्याबाबत महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, सर्व्हर बंदच्या काळात ज्या वीजग्राहकांना वीजबिल भरता आले नाही, त्यांची देय दिनांक वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.