जिल्ह्यात उभे राहणार महिला विकास भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:55 PM2020-12-28T17:55:37+5:302020-12-28T17:56:43+5:30

Woman Ratnagiri zp- महिलांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच त्यांच्या उध्दारासाठी शासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला विकास भवन उभारण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच इमारतीमध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Mahila Vikas Bhavan will be set up in the district | जिल्ह्यात उभे राहणार महिला विकास भवन

जिल्ह्यात उभे राहणार महिला विकास भवन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात उभे राहणार महिला विकास भवनसर्व कार्यालये एकाच छताखाली येणार

रत्नागिरी : महिलांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच त्यांच्या उध्दारासाठी शासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला विकास भवन उभारण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच इमारतीमध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे.

महिलांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. यापैकी अनेक योजनांची माहिती खेड्यापाड्यातील महिलांना नसते. अनेक योजना खेड्यांमध्ये पोहोचण्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना मिळत नसल्याने त्यापासून त्या वंचित राहात आहेत. महिला विकास भवन उभारल्यास महिलांसाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. महिलांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर महिलांना वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यालयामध्ये न जाता एकाच छताखाली सर्व योजनांची माहिती मिळणार आहे.

दुर्लक्षित, संकटग्रस्त महिला, बालकांचे संरक्षण तसेच पुनर्वसन यांसह इतर शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे महिलांसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार असून, त्या माध्यमातून महिलांचा विकास साधता येणार आहे. या महिला विकास भवनामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास अधिकारी, राष्ट्रीय महिला आयोग यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कार्यालये छताखाली

विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर योजनांची अंमलबजावणी होणार आहे. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे ठरणार आहे.

Web Title: Mahila Vikas Bhavan will be set up in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.