बिबट्याच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:41+5:302021-09-25T04:33:41+5:30

रत्नागिरी : बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी अजित चंद्रकांत नातू (, वय ४८, रा. धाकोरा, ता. सावंतवाडी, जि. ...

The main accused in the case of smuggling of leopard skin was arrested | बिबट्याच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

बिबट्याच्या कातडीच्या तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

Next

रत्नागिरी : बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी अजित चंद्रकांत नातू (, वय ४८, रा. धाकोरा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला वनविभागाने धाकोरा येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडे सापडलेली सांबराची दोन शिंगे व कवटीही वनविभागाने ताब्यात घेतली. आरोपीला प्रथमवर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत ३ दिवसांची वन कोठडी दिली आहे.

२० सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली (ता. राजापूर) येथील पेट्रोल पंपावर संशयास्पद स्थितीत आढळलेल्या जयेश बाबी परब (वय २३), दर्शन दयानंद गडेकर (वय २०) आणि दत्तप्रसाद राजेंद्र नाईक (वय २२, सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांना रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला, तसेच बिबट्याच्या कातडीसह दोन मोटारसायकल गाडी तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपींकडून जप्त केले.

या आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर वनविभागामार्फत त्यांची कसून चाैकशी केली असता, बिबटयाची कातडी आरोपी जयेश परब याच्या पिठाच्या गिरणीवर काम करणारा अजित चंद्रकांत नातू (वय ४८ रा. धाकोरा, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार रत्नागिरी परिक्षेत्राच्या वनअधिकारी प्रियांका लगड आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी धाकोरा येथे जाऊन अजित नातू याला ताब्यात घेतले. त्यानेही गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडे सांबराची दोन शिंगे व कवटी सापडली. तीही जप्त करण्यात आली आहेत. नातू याच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या कलम ९,३९,५१,५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. या आरोपीला प्रथमवर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता सरकारी वकील ओंकार गांगण यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू सक्षमपणे न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे न्यायालयाने नातू याला २५ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी दिली आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूरचे वनपाल स. व. घाटगे, संगमेश्वरचे तो.र.मुल्ला, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक कोले सागर पताडे, साखरपाचे न्हा.नु.गावडे, आरवलीचे आकाश कडूकर, लांजाचे विक्रम कुंभार, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर, राहुल गुंठे, सूरज तेली यांनी केली.

Web Title: The main accused in the case of smuggling of leopard skin was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.