सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:52 PM2022-01-12T16:52:56+5:302022-01-12T17:23:17+5:30

तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. भरणे ग्रामपंचायतीत त्यातील १४ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

Mandal officer of Khed gram panchayat office arrested for accepting bribe of Rs 14000 | सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

Next

खेड : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाेंद करुन मंजूर करुन देण्यासाठी १४ हजारांची लाच घेताना भरणे (ता. खेड) ग्रामपंचायत कार्यालयातील मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. सचिन यशवंत गाेवळकर (४३) असे ताब्यात घेतलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई आज, बुधवारी (१२ जानेवारी) दुपारच्या सुमारास करण्यात आली.

भरणे येथील एका ७२ वर्षीय वृद्धाने जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर त्यांच्या नावाची नाेंद घालून ती मंजूर करुन देण्यासाठी अर्ज केला हाेता. या नाेंदीसाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. त्यानंतर तडजाेडीनंतर १४ हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार त्यांनी बुधवारी भरणे ग्रामपंचायतीत १४ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. मंडल अधिकारी यांना रकमेसहीत ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरीचे पाेलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पाेलीस हवालदार विशाल नलावडे, पाेलीस नाईक याेगेश हुंबरे, दीपक आंबेकर, पाेलीस शिपाई हेमंत पवार, चालक पाेलीस शिपाई प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.

Web Title: Mandal officer of Khed gram panchayat office arrested for accepting bribe of Rs 14000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.