तायक्वाॅंदाे स्पर्धेत मंडणगडच्या खेळाडूंनी पटकावली २२ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:52+5:302021-03-19T04:30:52+5:30

फोटो ओळी : खेड येथे पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज तायक्वाॅंदाे स्पर्धेतील पदक विजेत्या मंडणगडमधील खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन ...

Mandangad players won 22 medals in Taekwondo competition | तायक्वाॅंदाे स्पर्धेत मंडणगडच्या खेळाडूंनी पटकावली २२ पदके

तायक्वाॅंदाे स्पर्धेत मंडणगडच्या खेळाडूंनी पटकावली २२ पदके

Next

फोटो ओळी : खेड येथे पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज तायक्वाॅंदाे स्पर्धेतील पदक विजेत्या मंडणगडमधील खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला. यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुका तायक्वाॅंदाे ॲकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, क्लब अध्यक्ष आदेश मर्चंडे, क्लब सचिव काजल लोखंडे, तालुका मुख्य प्रशिक्षक तेजकुमार लोंखडे उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : खेड येथे १४वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज फाईट व ८वी पुमसे तायक्वाॅंदाे चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वाॅंदाे ॲकॅडमीच्या २७ खेळाडूंनी सहभाग घेऊन २२ पदकांची कमाई केली.

स्पर्धेमध्ये मंडणगडच्या खेळाडूंनी सब-ज्युनियर (मुली) गटात शर्वरी शरदकुमार काकडे -सुवर्ण, श्वेता शिवप्रसाद हत्ते - राैप्य, आर्या शिवप्रसाद हत्ते - कांस्य, मुलांच्या गटात पार्थ प्रशांत सुर्वे - कांस्य, कॅडेट मुले गटात हर्शल श्रीकांत लेंढे - कांस्य, ज्युनिअर मुले गटातील ४८ किलो आतील वजनी गटात सिध्देश संजय कदम - सुवर्ण, ५९ किलो आतील वजनी गटात सुमेध राजेष मर्चंडे - सुवर्ण, ७३ किलो आतील वजनी गटात साहिल सचिन म्हाप्रळकर - सुवर्ण, ५१ किलो वजनी गटात प्रणव प्रमोद जाधव - रौप्य, ६३ किलो आतील वजनी गटात हर्श नीलेश गोवळे - रौप्य, सिनियर पुरुष गटात ५८ किलो वजनी गटात तेजकुमार विश्वदास लोखंडे - सुवर्ण, ८७ किलोवरील वजनी गटात दिवेश चंद्रकांत काळपाटील - कांस्य, सिनियर महिला गटात ५३ किलो वजनी गटात सृष्टी विश्वदास लोखंडे - रौप्य, ६२ किलो वजनी गटात तृषाली भरत चव्हाण - रौप्य, आठ वर्षाआतील स्पेशल कॅटेगरीत मुले या गटात २१ किलो वजनी गटात प्रषिक आदेश मर्चंडे - रौप्य पदक मिळवून संपादन केले.

तायक्वाॅंदाे सिनियर पुमसे वैयक्तिक गटात काजल विश्वदास लोखंडे - सुवर्ण, सिनियर महिला ग्रुपमध्ये सृष्टी विश्वदास लोखंडे, विशाखा संजय करावडे, तृषाली भरत चव्हाण - रौप्य, सिनियर पुरुष ग्रुपमध्ये तेजकुमार विश्वदास लोखंडे, तुषार सोमालिंग स्वामी, अभिषेक अशाेक मर्चंडे - कांस्य पदक मिळवून यश संपादन केले.

स्पर्धेतील सर्व विजयी व सहभाग घेणाऱ्या खेळाडूंचे मंडणगड तालुका तायक्वाॅंदाे ॲकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, क्लब अध्यक्ष आदेश मर्चंडे तसेच ॲकॅडमी व क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Web Title: Mandangad players won 22 medals in Taekwondo competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.