मंडणगड तालुक्यात दोन महिन्यात ३५ गावांत आढळले १७३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:33 AM2021-04-23T04:33:32+5:302021-04-23T04:33:32+5:30
मंडणगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मंडणगड तालुक्यातील प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील ३५ गावांत १७३ ...
मंडणगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मंडणगड तालुक्यातील प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील ३५ गावांत १७३ रुग्ण आढळले. यापैकी ४३ रुग्ण बरे झाले आहेत, तर १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आढळलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
पणदेरी ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्रातील १२ गावांमधे ६८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी २२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४६ जण उपचार घेत आहेत. पणदेरी रुग्णालय क्षेत्रात दि. २१ एप्रिलपर्यंत पणदेरी गावात ३ रुग्ण सापडले हाेते. तीनही रुग्ण बरे झाले आहेत. पालवणीमध्ये ७ रुग्ण सापडले, यापैकी ४ बरे झाले आहेत. पेवे येथे ४ रुग्ण सापडले, यापैकी १ बरा झाला आहे. भिंगळोलीत १५ रुग्ण सापडले, यापैकी ६ बरे झाले आहेत. मंडणगडमध्ये २७ रुग्ण सापडले असून, ६ बरे झाले आहेत. बोरघर येथे ३ रुग्ण सापडले आहेत. पाटमध्ये ४ रुग्ण, तर पाले, सुर्ले उंबरशेत, वेरळ तर्फ नातू, धुत्रोली येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
कुंबळे प्राथमिक रुग्णालय क्षेत्रातील १३ गावांमध्ये एकूण ६४ रुग्ण सापडले. यापैकी १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कुंबळे गावात ४ रुग्ण सापडले, यापैकी २ बरे झाले आहेत. चिंचाळीत ३ रुग्ण सापडले, ते तीनही बरे झाले आहेत. टाकेडे १८ रुग्ण सापडले, यापैकी ४ बरे झाले आहेत. दहागावात ६ रुग्ण सापडले, यापैकी १ बरा झाला आहे. बामणघर, भोळवलीत २ रुग्ण सापडले, दोन्हीही बरे झाले आहेत. लाटवणमध्ये आढळलेला एक रुग्ण बरा झाला आहे. शेनाळेत १२ रुग्ण, सोवेलीत २, कादवणला २, केळवतला ९, विन्हे येथे १, सडे येथे २ रुग्ण आढळले आहेत.
देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील १० गावांमध्ये ४१ रुग्ण सापडले, यापैकी ७ बरे झाले आहेत, तर ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आंबवलीत आढळलेला १ रुग्ण बरा झाला आहे. आतले येथे ३ रुग्ण सापडले, यापैकी १ बरा झाला आहे. गोकुळगावला ९ रुग्ण सापडले, यापैकी २ बरे झाले आहेत. नायणे येथे १३ रुग्ण सापडले आहेत. बाणकोटला ५ रुग्ण सापडले, यापैकी ३ बरे झाले आहेत. देव्हारेत ५ रुग्ण सापडले, कळकवणेत १, वडवलीत २, निगडीत १ आणि वेसवी येथे १ रुग्ण आढळला आहे.