मंडणगडात सेना, राष्ट्रवादीला धक्का

By admin | Published: March 18, 2016 10:28 PM2016-03-18T22:28:31+5:302016-03-18T23:21:42+5:30

बाळ मानेंची उपस्थिती : आंबडवे, आसावले येथील ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल

Mandangadat army, NCP push | मंडणगडात सेना, राष्ट्रवादीला धक्का

मंडणगडात सेना, राष्ट्रवादीला धक्का

Next

मंडणगड : आंबडवे व आसावले गावातील शेकडो ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीने आंबडवे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ग्रामस्थ प्रकाश गावडे व राजेश कासरुम यांच्या प्रयत्नाने आयोजित पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने उपस्थित होते.या कार्यक्रमामुळे भारतीय जनता पार्टी तालुक्यात खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होत असल्याची प्रचिती येत असताना, आंबडवे पंचक्रोशीत झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेना व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष सचिन थोरे, सरचिटणीस गिरीष जोशी, राजेश नगरकर, रवींद्र मिश्रा, पुष्पराज कोकाटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत जगदाळे, अनुराग कोळंबेकर, आकाश नाविलकर, तेजस घस्ते, लवू साळुंखे, शरद गमरे, डॉ. सुहास पवार, डॉ. प्रभाकर पेंडसे, विजय शिंदे, प्रिया दरिपकर, काजल लोखंडे, दत्ताराम लाखण, नितीन थोरे, साईराज पफुलवार, आदी पदाधिकारी व पार्टीचे तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते़ संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून आंबडवे पंचक्रोशीच्या विकासासह तालुक्याच्या विकासाला पोषक काम करण्यासाठी राज्य व केंद्रशासन प्रयत्न करत आहे. या कामांचा सकारात्मक परिणाम जनतेवर होत आहे. लोकांना आवश्यक असलेला राजकीय पर्याय भारतीय जनता पार्टीने ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिल्याने आंबडवे पंचक्रोशीत राजकीय परिवर्तन सुरु झाले आहे. पक्षाच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवत प्रवेश केलेल्या कोणाही कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होणार नसल्याचे यावेळी पार्टीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले़ यावेळी पाडुरंग काप, प्रकाश गावडे, संजय पवार, प्रभाकर शिगवण, अनंत काप, संतोष चाचले, गणपत चाचले, कृष्णा चाचले, बाबल्या भुवड, प्रकाश गावडे, भिकू खांबे, संगिता कासरुम, स्वप्नाली कासरुम, दीपाली जाखल यांच्यासह आंबडवे व आसावले येथील दोनशेहून अधिक महिला व पुरुष ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी सोवेली येथील दीपक दळवी यांनीही भाजप पक्षात प्रवेश केला़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंबडवे व आसावले येथील ग्रामस्थांनी मेहनत घेतली.़ (प्रतिनिधी)


मंडणगड तालुक्यात भाजपने आपले अस्तित्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आंबडवे, आसावले येथील प्रवेशासाठी प्रकाश गावडे, राजेश कासरूम यांनी प्रयत्न केले होते.


केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. हाच मुद्दा हाताशी धरून भाजपने जिल्ह्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी जिल्हा दौरे केले जात आहेत.



भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी जिल्हा दौरा करून पक्षप्रवेशाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, त्याचा खरा परिणाम निवडणुकीतच दिसून येणार असल्याने हे प्रवेश किती फायद्याचे ठरणार?

Web Title: Mandangadat army, NCP push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.