मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:24 PM2023-06-02T18:24:17+5:302023-06-03T11:57:04+5:30
दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले
शिवाजी गोरे
दापोली : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळविणाऱ्या मनीष महेश कोकरे याला आयएएस अधिकारी बनायचं आहे. बाल वयातच स्पर्धा परीक्षेची त्याला गोडी लागली असून त्याने आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
मनीषचे वडील महेश कोकरे आदर्श जिल्हा परिषद शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहेत. मनीषला अगदी बालनपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आई वडिलांना यश आले. पहिल्या वर्गापासून नववी पर्यंत मनीष अव्वल राहिला, आणि आता 10 वीत चक्क कोकण बोर्डात पैकीच्या पैकी गुण घेवून प्रथम आला आहे. त्याच्या यशात ज्ञानदीप विद्यामंदिरचे शिक्षक, आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थी बोर्डात येण्याचा बहुमान कोकरेने मिळाला आहे.
आपल्या यशात शाळेतील सर्व शिक्षक, आई-वडिल यांचा सिंहाचा वाटा असून यापुढे दहावी प्रमाणेच बारावीतही यश संपादन करण्याचे ध्येय आहे. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण करण्याचा मानस असून त्यानंतर मात्र आयएएसची तयारी सुरू ठेवणार असल्याचे मनीषने सांगितले.
मनीषने केलेल्या अभ्यासामुळे तो नक्कीच गुणवत्ता यादीत येईल याची खात्री होती. त्याने केलेल्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले. त्याच्या यशात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. - महेश कोकरे, वडील