खेड सभापतिपदी मानसी जगदाळे बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:23+5:302021-03-17T04:32:23+5:30
khed-photo162 खेड येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी मानसी जगदाळे यांची निवड झाल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले. लाेकमत ...
khed-photo162
खेड येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी मानसी जगदाळे यांची निवड झाल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी मानसी महेश जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी त्यांना निवडपत्र दिले. प्रभारी सभापती तथा उपसभापती जीवन आंब्रे यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला.
खेड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती विजय कदम यांनी पक्षादेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला हाेता. त्यानंतर उपसभापती जीवन आंब्रे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला हाेता. मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या उपस्थितीत सभापती निवड कार्यक्रम पार पडला. पंचायत समितीत शिवसेना ८, राष्ट्रवादी ४ व अपक्ष १ असे बलाबल आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भरणे गणातून अपक्ष निवडून आलेल्या मानसी जगदाळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. पंचायत समितीचा कार्यकाल पुढील वर्षी मार्च महिन्यात संपणार असल्याने शेवटच्या एका वर्षाच्या कालावधीत मानसी जगदाळे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. यावेळी आमदार योगेश कदम, गटविकास अधिकारी गुरुनाथ पारशे, सहायक प्रशासनाधिकारी परशुराम इचूर, वरिष्ठ सहायक धनंजय दरेकर उपस्थित होते.