दिव्यांगांच्या लग्नगाठीने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:30 PM2019-05-13T12:30:30+5:302019-05-13T12:32:50+5:30

सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता.

Many people have a tears in the eyes of Divyang's wedding | दिव्यांगांच्या लग्नगाठीने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

दिव्यांगांच्या लग्नगाठीने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

Next
ठळक मुद्देनाते जुळले मनाशी मनाचे मनाची कथा मनाला कळते, मैत्रीचे नाते जेव्हा विवाहात बदलते

अरूण आडिवरेकर/मेहरून नाकाडे

रत्नागिरी : सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता.

कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर लग्नबंधनात झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे लग्न पाहण्यासाठी वºहाडी मंडळींनी गर्दी केली होती.


रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात योगेश खाडे (शिरोळ) या दिव्यांग तरूणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सदस्यपद योगेशने स्वीकारले होते, तर सुवर्णा एरीम ही संस्थेची पूर्वीपासून सदस्या होती.

पॅराप्लेजिकल संघटनेच्या मेळाव्यासाठी योगेश कोल्हापूरहून रत्नागिरीत आला होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन सुवर्णाने केले, त्यामुळे मेळाव्यानंतर ओळख झाली. सुवर्णा ही पोलिओग्रस्त आहे तर योगेश पॅराप्लेजिकल आहे. योगेश स्वत: छायाचित्रकार असून, घराजवळच स्टुडिओ आहे.

योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली. योगेशने सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभार्इंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती, प्रश्न होता सुवर्णाच्या घरच्या मंडळींचा. परंतु दोघांचे विचार जुळले असल्याने शिवाय रितसर खाडे कुटुंबियांकडून मागणी असल्याने एरिम कुटुंबियांनीही परवानगी दिली. सादीकभार्इंच्या पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.

शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी साखरपुडा व रविवारी दुपारी ३.१८ मिनिटांनी देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागले. व्हिलचेअरवर बसून उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन धडपड्या जीवांचं शुभमंगल अनेकांना आयुष्यात उभं राहण्याचं धडा देऊन गेलं.

नयनी आले आनंदाश्रू

सुवर्णा,योगेश या उभयतांना भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनकडेच यजमानपद असल्याने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहिता लग्नाच्या तयारीत त्यांनी हातभारही लावला होता. हा विवाह जुळून येण्यापासून ते तो पार पडेपर्यंत साऱ्याच घटनांना संस्थेचा स्पर्श झाला. मात्र मैत्रीची कहाणी प्रेमात बदलल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळला होता.

Web Title: Many people have a tears in the eyes of Divyang's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.