मराठा समाज शांत आहे म्हणजे सहनशील आहे, असे समजू‌ नये : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:31+5:302021-05-06T04:33:31+5:30

रत्नागिरी : सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. ...

Maratha society is calm, it means tolerant, don't think so: Nilesh Rane | मराठा समाज शांत आहे म्हणजे सहनशील आहे, असे समजू‌ नये : नीलेश राणे

मराठा समाज शांत आहे म्हणजे सहनशील आहे, असे समजू‌ नये : नीलेश राणे

googlenewsNext

रत्नागिरी : सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. याच सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की समाज शांत आहे म्हणजे तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा या सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणे बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटले नाही, कारण सरकार असेपर्यंत आरक्षण मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही नव्हते. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे गेल्यावेळीच आपण सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा शरद पवार असोत त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. ते कधीही मराठ्यांच्या बाजूने बोलले नाहीत, असे ते म्हणाले.

सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना रस्त्यावर आणण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असं सांगतानाच ते पुढे म्हणाले की, मराठा समाज शांत आहे याचा अर्थ असा नव्हे की, तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना लापायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा; पण तरुणांच्या जिवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही नीलेश राणे यांनी दिला आहे.

Web Title: Maratha society is calm, it means tolerant, don't think so: Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.