रत्नागिरीत मराठी विज्ञान अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:16 AM2020-01-11T05:16:56+5:302020-01-11T05:17:00+5:30
मराठी विज्ञान परिषदेचे चोपन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १८, १९ आणि २० जानेवारी दरम्यान केशवसुत स्मारक, मालगुंड (रत्नागिरी) येथे होणार आहे.
Next
मुंबई : मराठी विज्ञान परिषदेचे चोपन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १८, १९ आणि २० जानेवारी दरम्यान केशवसुत स्मारक, मालगुंड (रत्नागिरी) येथे होणार आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ प्रा. हेमचंद्र प्रधान हे अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार हे अधिवेशन केशवसुत स्मारकात होत आहे, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेकडून देण्यात आली.