कर्ला मच्छीमार सोसायटीमध्ये मच्छीमारांसाठी सागरी सुरक्षा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:30 AM2021-03-18T04:30:59+5:302021-03-18T04:30:59+5:30
फोटो मजकूर १७ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये कोस्टल गार्ड फोल्डरला तीन फोटो आहेत. फोटो मजकूर १) तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे ...
फोटो मजकूर
१७ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये कोस्टल गार्ड फोल्डरला तीन फोटो आहेत.
फोटो मजकूर
१) तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे कमांडड डी.आय.जी. के. ल. अरुण यांनी मच्छिमारांनी समुद्रामध्ये मासेमारी करत असताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
२ आणि ३ - भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख डी.पी. टोमर यांनी लाइफ जॅकेट, लाइफ बोया यांचे योग्य उपयोग व वापरण्याचे प्रात्यक्षिके दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारताच्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली ७५ वर्षाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने भारत सरकारने ‘भारत का अमृत महोत्सव’ हा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी व कर्ला मच्छीमार सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सागरी सुरक्षा’विषयी कार्यक्रमाचे आयोजन कर्ला मच्छिमार सोसायटीमध्ये केले होते.
भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे कमांडड डी.आय.जी. के.ल. अरुण प्रमुख अतिथी होते. त्यांनी मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासेमारी करत असताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. मासेमार हे तटरक्षक दलाचे मित्र असून मासेमारांना भारतीय तटरक्षक दलाकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन अरुण यांनी दिले. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख डी.पी. टोमर यांनी लाइफ जॅकेट, लाइफ बोया यांचे योग्य उपयोग व वापरण्याचे प्रात्यक्षिके दाखविली. मासेमारानी समुद्रात जात असताना बोटीवरील सर्व मासेमारांचे ओळखपत्र, बोटीचे कागदपत्रे घेऊनच समुद्रात जावे असे मार्गदर्शन केले. टोमर यांनी तटरक्षक दलाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक देऊन समुद्रामध्ये जर एखादी अनोळखी किवा संशयित बोट किवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ तटरक्षक दलाला कळविण्याचे आवाहन केले.
कर्ला सहकारी मच्छिमार संस्थेचे चेअरमन नदीम सोलकर यांनी भारतीय तटरक्षक दल व रिलायन्स फाउंडेशनचेचे स्वागत केले व भारतीय तटरक्षक दल मासेमारांसाठी समुद्रामध्ये किती महत्त्वाचा दुवा आहे, याची माहिती दिली. रिलायन्स फाउंडेशन व भारतीय तटरक्षक दल मासेमारांसाठी करत असलेल्या कामाबद्दल आभार मानले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी ‘भारत का अमृत महोत्सव’ या उपक्रमाबद्दल तसेच रिलायन्स फाउंडेशन मच्छीमारांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
रत्नागिरी शहरी पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी ‘मिशन सागर’ बद्दल मासेमारांना माहिती दिली. भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीचे डेप्युटी कमांडंट सचिन, सुधीर, चिरंजीलाल, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक मत्स्य विकास अधिकारी एस .एच. पाठारे, सागरी पोलीस ठाण्याचे सुहास मांडवकर उपस्थित होते.
कर्ला मच्छीमार सहकारी संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले. नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक चिन्मय साळवी यांनी केले. कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून करण्यात आला.