फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देणार - उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:25 PM2022-10-10T12:25:54+5:302022-10-10T12:26:44+5:30

अदाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजकांसाठी राज्यकर्ते रेड कार्पेट अंथरतात. परंतु, ५० लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्व्हिस देण्याची आवश्यकता आहे

Marketing of self-help groups will be linked with Flipkart says Industries Minister Uday Samant | फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देणार - उद्योगमंत्री उदय सामंत

संग्रहित फोटो

googlenewsNext

रत्नागिरी :  महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, याकरिता राज्याचे धोरण उद्योगस्नेही बनवण्यात येईल. उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे काम मोठे आहे. त्यांच्या बरोबरीने उद्योग खाते व शासन म्हणून आम्ही पूर्ण पाठबळ देऊ. उद्योजकांच्या अडचणी, समस्या चेंबरने आमच्याकडे मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे राहू, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त अंबर हॉल येथे कोकण उद्योग मंथन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, पर्यटन समिती अध्यक्ष संतोष तावडे आदींसह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरीत उद्योग पाहिजेत म्हणणारे फक्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. उद्योगाला विरोध करणारे रस्त्यावर उतरत आहेत. समर्थनासाठीही रस्त्यावर उतरले पाहिजे. उद्योग येण्याकरिता त्यांना फक्त इन्सेंटिव्ह देऊन नाही तर स्थानिक लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.

उद्योजकांच्या समस्या चेंबर्सने वकिली करून मांडाव्यात. बीच शॅक पॉलिसी आली. परंतु यात ७ वाजता हॉटेल बंद करायचे असेल तर उपयोग नाही, हे मी कॅबिनेट बैठकीत सांगितले होते. तेव्हा मला खुळ्यात काढले. आता या पॉलिसीत सुधारणा करून १० वाजेपर्यंत मुदत दिली जाणार आहे, असे मंत्री म्हणाले.

छोट्या उद्योगांसाठीही रेड कार्पेट

अदाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजकांसाठी राज्यकर्ते रेड कार्पेट अंथरतात. परंतु, ५० लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्व्हिस देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता राज्याचे इन्सेंटिव्ह धोरण लवकरच मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत वर्षभरात जिल्ह्याला ५५० कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड

फ्लिपकार्टसोबत महिला बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देण्यात येणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गेली साडेसात वर्षे मी मुंबईतून आलेल्या पालकमंत्र्यांना बचत गटांच्या मार्केटिंगसाठी २ कोटी द्या, असे सांगत होतो. ते का झाले नाही, हे माहीत नाही. बचत गटांना मार्केटिंगसाठी जागा देण्याचे धोरण आम्ही अंमलात आणणार आहोत, असे ते म्हणाले.

Web Title: Marketing of self-help groups will be linked with Flipkart says Industries Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.