मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा मोजक्याच उपस्थितीत संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:59 PM2022-01-14T18:59:13+5:302022-01-14T18:59:35+5:30

देवरूख : स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच ...

Marleshwar Girijadevi's wedding ceremony was held in a small presence | मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा मोजक्याच उपस्थितीत संपन्न 

मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा मोजक्याच उपस्थितीत संपन्न 

googlenewsNext

देवरूख : स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच उपस्थितीत आज, शुक्रवारी दुपारी २.४५ वाजताच्या मुहूर्तावर पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा विवाहसोहळा कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने संपन्न झाला. 

सकाळी मार्लेश्वरची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान वाडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आगमन झाले. यानंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. विवाहसोहळ्याला दुपारी प्रत्यक्षात प्रारंभ होण्यापुर्वी परंपरेप्रमाणे तब्बल ३६० मानकऱ्यांना अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले.
 
यानंतर मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाहसोहळ्याला लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी दुपारी २.४५ वाजताच्या शुभमुहूर्तावर पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी भाविकांची गर्दी होवू नये किंवा कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी मारळ फाटा व मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Web Title: Marleshwar Girijadevi's wedding ceremony was held in a small presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.