खड्डेमय रस्त्याच्या विराेधात संगमेश्वरात जनआंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:39+5:302021-09-08T04:37:39+5:30

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी, खड्डेमय रस्त्याच्या विरोधात संगमेश्वर येथे साेमवारी मानवी साखळी जनआंदोलन करण्यात आले. जनतेच्या न्याय ...

Mass agitation in Sangameshwar against the rocky road | खड्डेमय रस्त्याच्या विराेधात संगमेश्वरात जनआंदाेलन

खड्डेमय रस्त्याच्या विराेधात संगमेश्वरात जनआंदाेलन

Next

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी, खड्डेमय रस्त्याच्या विरोधात संगमेश्वर येथे साेमवारी मानवी साखळी जनआंदोलन करण्यात आले. जनतेच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलकांच्या घोषणांनी संगमेश्वर परिसर दणाणून गेला होता.

समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समितीचे प्रमुख संजय यादवराव व राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, ॲड.ओवेस पेचकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर येथे युयुत्सु आर्ते, रमजान गोलंदाज, विवेक शेरे, अमोल लोध यांनी आंदोलनाची मूठ बांधली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या दिरंगाईमुळे कोकणवासीयांचा, प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. या आंदोलनात जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा. शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी. अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत. जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये. डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा. महामार्गावर विविध झाडे लावत देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा. दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाला परिसरातील लोकांनी, व्यापाऱ्यांनी, अनेक संघटनानी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात जितेंद्र चव्हाण, मकरंद गांधी, जमूरत अलजी, रिंकू कोळवणकर, राजेंद्र पोमेंडकर, हरीभाई पटेल, तैमूर अलजी, गुलाम पारेख, अनंत पाताडे, दिनेश निंगावले, विनायक खातू, शादाब बोट, दिलदार कापडी, धनाजी भांगे, पपू सप्रे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

060921\3039img-20210906-wa0095.jpg

आंदोलन फोटो

Web Title: Mass agitation in Sangameshwar against the rocky road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.