Ratnagiri: ट्रेडिंगद्वारे फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार अटकेत, खेड पोलिसांची चंदीगड येथे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:49 PM2024-06-25T16:49:33+5:302024-06-25T16:50:16+5:30

पैसे काढणारी व्यक्ती दुसरीच

Mastermind of fraud through trading arrested, khed police action in Chandigarh | Ratnagiri: ट्रेडिंगद्वारे फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार अटकेत, खेड पोलिसांची चंदीगड येथे कारवाई

Ratnagiri: ट्रेडिंगद्वारे फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार अटकेत, खेड पोलिसांची चंदीगड येथे कारवाई

खेड (जि. रत्नागिरी) : बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन व शेअर मार्केट ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून खेड येथील एकाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली हाेती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंडीगड येथून अटक केली आहे. नीरज महेंद्र जांगरा (२२, सध्या रा. घर नंबर १७८, सेक्टर ३८ (ए), चंडीगड मूळ रा. कुर्दल -७०, भिवाणी, हरयाणा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हा प्रकार १९ एप्रिल ते २४ मे २०२४ या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांना संशयित व्हाॅट्सॲप ग्रुपवरून ट्रेडिंगसंदर्भात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आले हाेते. त्यानुसार फिर्यादीला एआरके ग्रुप या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही रक्कम वेगवेगळ्या ६ बँक खात्यांवर पाठविण्यात आली हाेती. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

या प्रकरणाचा तपास करताना याचे धागेदाेरे चंडीगड व जाेथपूरपर्यंत असल्याचे समोर आले. त्यानुसार पाेलिसांचे पथक पाठविण्यात आले हाेते. तिथून नीरज जांगरा याला ताब्यात घेऊन २१ जून राेजी अटक केली. त्याला पोलिस काेठडी सुनावली आहे.

चंदीगड, जाेधपूरच्या एटीएमचा वापर

अपहृत रक्कम ही पुढे अन्य ४३ बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली हाेती. त्यानंतर पुढे २२ वेगवेगळ्या खात्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आल्याची माहिती समोर आली हाेती. अपहृत रकमेपैकी ४ लाख ५० हजार रुपये चंडीगड व जोधपूर येथील एटीएमचा वापर करून काढण्यात आले हाेते.

पैसे काढणारी व्यक्ती दुसरीच

पाेलिसांच्या पथकाने बँकेतील सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे माहिती घेतली असता एटीएममधून पैसे काढणारी व्यक्ती व्यसनाच्या लोभापोटी अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे काढत हाेती. त्यानंतर पैसे नीरज जांगरा याच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Mastermind of fraud through trading arrested, khed police action in Chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.