कोविड सेंटरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडून साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:29+5:302021-04-30T04:40:29+5:30
देवरुख : देवरुख येथील कोविड सेंटरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा दक्षिण रत्नागिरीतर्फे मास्क, हँडग्लोज, ऑक्सिमीटर मंगळवारी ...
देवरुख : देवरुख येथील कोविड सेंटरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा दक्षिण रत्नागिरीतर्फे मास्क, हँडग्लोज, ऑक्सिमीटर मंगळवारी (दि. २७) भेट म्हणून देण्यात आले.
जनकल्याण समिती ही सामाजिक बांधीलकी जपून काम करीत असते. जनतेच्या गरजा अचूक हेरून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी कोरोना कालावधीत सामाजिक उपक्रम राबवून प्रशासनाला सहकार्य केले. पुन्हा एकदा कोरोनाचा सामना करण्यासाठी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी मदत केंद्र सुरू केले आहे.
समितीचे पदाधिकारी कोविड सेंटरमधील अधिकारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांच्या संपर्कात असून कोणत्या बाबीची आवश्यकता आहे याबाबत लक्ष ठेवून आहेत. देवरुख येथील कोविड सेंटरच्या मागणीनुसार मंगळवारी एन ९५ चे ४० मास्क, २०० हँडग्लोज, २ ऑक्सिमीटर सुपुर्द करण्यात आले आहेत. यावेळी डॉक्टर व सहकारी यांसह जनकल्याण समितीचे सुरेश करंडे, राष्ट्रसेविका समितीच्या नेहा जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवरुख तालुका कार्यवाह संदीप पानगले उपस्थित होते. कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण, नातेवाईक यांना जी मदत लागेल, त्यासाठी जनकल्याण समिती सज्ज असल्याचे सुरेश करंडे यांनी स्पष्ट केले आहे.
......................
देवरुख कोविड सेंटरकडे जनकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे साहित्याचे वाटप केले. देवरुख कोविड सेंटरकडे जनकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे साहित्याचे वाटप केले.