संगलटमधील तहानलेल्या वाड्यांची तहान भागविणार मातोश्री ट्रस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:15+5:302021-05-08T04:33:15+5:30
खेड : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र हाेऊ लागल्या आहेत़ संगलट गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, ...
खेड : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र हाेऊ लागल्या आहेत़ संगलट गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, या तहानलेल्या गावाची तहान भागविण्यासाठी माताेश्री ट्रस्ट, नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि कुर्ला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८४च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे़ या सर्वांच्या प्रयत्नाने संगलट गावासाठी पाण्याचा टँकर पाठविण्यात आला़
तहानलेल्या व पाण्यासाठी वणवण करणाऱ्या संगलट गावातील महिलांची अडचण खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या कानावर आली़ त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मनसेचे मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मनोज चव्हाण यांना संपर्क करून मदतीचा हात मागितला. त्यांनी ताबडतोब पाण्याची व्यवस्था केली व त्या वाड्यांना टँकर उपलब्ध करून दिला.
या टँकरचे श्रीफळ वाढवून नगराध्यक्ष व मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, रजनीकांत जाधव, अविनाश वैद्य, विभाग अध्यक्ष पीयूष माने, प्रसिद्धी माध्यमप्रमुख अंकुश मिर्लेकर उपस्थित होते. यावेळी मातोश्री ट्रस्टचे मनोज चव्हाण व न्यू इंग्लिश स्कूल कुर्ला बॅच १९८४ यांच्या सौजन्याने पुढील दीड महिना असाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़