‘मत्स्यगंधा’त प्रवाशाला लुबाडले

By admin | Published: January 10, 2017 10:31 PM2017-01-10T22:31:32+5:302017-01-10T22:31:32+5:30

पाच महिन्यांनी गुन्हा दाखल : संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग

In Matsyagandha the tourist looted | ‘मत्स्यगंधा’त प्रवाशाला लुबाडले

‘मत्स्यगंधा’त प्रवाशाला लुबाडले

Next

रत्नागिरी : ‘मत्स्यगंधा एक्सप्रेस’मधून पनवेल ते मेंगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बिस्किट व जिरा सोड्यात गुंगीचे औषध घालून पाजले. त्यानंतर त्याला १ लाख ६९ हजार ८०० रुपयाला गंडा घातल्याची घटना आॅगस्ट २०१६ मध्ये घडली होती. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिपर्ड जेरोम वैगास (३८, कर्नाटक) असे या फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.
क्लिपर्ड वैगास हा तरुण मत्स्यगंधा एक्सप्रेसने २८ आॅगस्ट २०१६ रोजी पनवेल येथून मेंगलोर येथे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याच्यासमोरील सीटवर एक ४० वर्षीय इसम बसला होता. त्याने आपण कपड्याचे व्यापारी आहोत, असे सांगून क्लिपर्ड याच्याशी मैत्री केली व गप्पागोष्टी मारण्यास सुरुवात केली. रात्री ९.३० वाजण्याचा सुमारास ही मस्त्यगंधा एक्सप्रेस ही संगमेश्वर स्थानकावर आली होती.
त्यावेळी त्या अज्ञाताने क्लिपर्ड याला गुंगीचे औषध टाकलेला जिरासोडा व बिस्किटे खाण्यासाठी दिली. त्यामुळे क्लिपर्ड याला गुंगी येऊ लागली. तो तेथेच झोपी गेला. हीच वेळ साधत या अज्ञाताने त्याच्याजवळ असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसहित लॅपटॉप, मोबाईल असा १ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान दुसऱ्या दिवशी रेल्वे मेंगलोर टर्मिनसला पोहचली तेव्हा क्लिपर्ड याला जाग आली. त्यावेळी आपले सामान चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे क्लिपर्ड यांनी तत्काळ मेंगलोर येथील रेल्वे पोलीसांना यांची माहिती दिली. त्याठिकाणी शून्य नंबरने गुन्हा दाखल करून तो संगमेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
‘मांडवी’, ‘जनशताब्दी’मध्येही चोरीचा प्रकार
मांडवी एक्स्प्रेस व जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना चिपळूण येथे रेल्वे स्टेशनमध्ये चढताना कल्याण येथील एका महिलेचे दागिने व रोख रक्कम मिळून ८२ हजार ६४१ रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एका महिलेचे १८ हजार ६८० रुपयाचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाख १ हजार ३२१ रुपयांची चोरी झाली. हे दोन्ही गुन्हे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घडले असून ते शून्य नंबरने चिपळूण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.

Web Title: In Matsyagandha the tourist looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.