कोविड योद्ध्यांच्या दुचाकी दुरुस्तीसाठी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लब सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:35+5:302021-04-19T04:28:35+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊन काळामध्ये कोविड योद्ध्याच्या दुचाकी बंद पडल्यास त्यांना सेवा देण्यासाठी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लब (एम. एस. डी. ...
रत्नागिरी : लॉकडाऊन काळामध्ये कोविड योद्ध्याच्या दुचाकी बंद पडल्यास त्यांना सेवा देण्यासाठी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लब (एम. एस. डी. सी.)चे पदाधिकारी पुढे आले आहेत.
लॉकडाऊन काळामध्ये पोलीस, वैद्यकीय क्षेत्र तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लाॅकडाऊनची काटेकाेरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व दुकाने बंद आहेत. त्याचबराेबर अत्यावश्यक सेवाही बंद आहेत. त्यामुळे काही वेळा अडचणीचे होत आहे. विशेषत: धावपळ करण्यासाठी वाहने महत्त्वाची आहेत.
सध्या सर्वच सेवा बंद राहिल्याने कोरोना योद्ध्यांच्या दुचाकी बिघडल्या तर त्या तातडीने दुरुस्त करून देण्यासाठी मॅकेनिक स्कील डेव्हलपमेंट क्लब रत्नागिरीचे सदस्य बंद पडलेली दुचाकी शक्य असल्यास जागेवर अथवा गॅरेजला आणून त्याची दुरुस्ती करून देण्यासाठी तयार आहेत. या क्लबच्या सदस्या कल्याणी शिंदे, राजू पोमेंडकर, विनोद कळंबटे, सुशील कदम हे सदस्य दुचाकी बंद पडल्यास ती दुरुस्त करून देणार आहेत. तसेच दुचाकी ब्रेकडाऊन झाल्यास मोहसीन वणू, मशाक कुरणे, सचिन सनगरे, शशिकांत शिंदे, वैभव लिंगायत, कुंदन पालकर हे सदस्य सेवा देणार आहेत.
अत्यावश्यक सेवा देताना दुचाकी बंद पडल्यास अशा व्यक्तींनी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लबच्या या सदस्यांकडे संपर्क करावा, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात येत आहे.