पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:38+5:302021-04-05T04:27:38+5:30

चिपळूण : येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक चिपळूण अध्यक्ष शैलजा लांडे ...

Meeting of Environment Conservation Women's Board | पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक

पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक

Next

चिपळूण : येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक चिपळूण अध्यक्ष शैलजा लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक उपस्थित होते. मंडळाचे राज्य सचिव आणि लेखक धीरज वाटेकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना मंडळाच्या जनजागृती कार्याबाबत मार्गदर्शन केले.

महिला सदस्य आणि मान्यवरांचे अध्यक्ष शैलजा लांडे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदस्यांनी आपली ओळख आणि करीत असलेल्या शालेय पर्यावरणविषयक उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या जनजागृतीपर कामाची व्याप्ती, आवश्यकता आणि उपयुक्तता स्पष्ट केली. ‘आपण आपल्या कार्यकक्षेत करीत असलेल्या उपक्रमांवर लक्ष कसे केंद्रित करावे, त्याच्या नियमित नोंदी ठेवून समस्या निराकरण कसे करावे, याबाबत वाटेकर यांनी मार्गदर्शन केले.

शालेय विद्यार्थ्यांवर निसर्ग जोपासण्याचे आणि पर्यावरण वाचविण्यासाठीचे संस्कार करताना कोणते छोटे-छोटे उपक्रम घेता येतील त्यात येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत त्यांनी माहिती दिली.

मंडळाचे अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी १९८२ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. वाटेकर यांनी वृक्ष संवर्धनासाठी गावागावातील ‘देवकं’ असणाऱ्या झाडांची यादी करून त्यांचे संवर्धन करण्याविषयी तसेच देवराया संवर्धनासाठी मंडळाची भूमिका सातत्याने मांडत राहण्याचे आवाहन केले.

यावेळी उपाध्यक्ष मायावती शिपटे, सचिव विनया देवरुखकर, खजिनदार प्रिया खेडेकर, सदस्या ज्योती कदम, सीमा कदम, नीलम मोहिते, सुप्रिया उबळेकर उपस्थित होत्या.

Web Title: Meeting of Environment Conservation Women's Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.