रत्नागिरीत उद्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातदारांचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:35 AM2021-09-23T04:35:45+5:302021-09-23T04:35:45+5:30

रत्नागिरी : आजादी का अमृत महोत्सव-७५ स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत Exporters Conclaves (निर्यातदारांचे संमेलन) व रत्नागिरी ...

A meeting of exporters will be held in Ratnagiri tomorrow under the chairmanship of the Collector | रत्नागिरीत उद्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातदारांचे संमेलन

रत्नागिरीत उद्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातदारांचे संमेलन

Next

रत्नागिरी : आजादी का अमृत महोत्सव-७५ स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत Exporters Conclaves (निर्यातदारांचे संमेलन) व रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यात होणारी उत्पादने व सेवा यांचे प्रदर्शन २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी २४ सप्टेंबर रोजी निर्यात दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी चर्चासत्रात आजादी अमृत महोत्सव संकल्पना व निर्यात प्रचालन उपक्रमांचे महत्त्व, निर्यातीसंबधी विविध टप्पे व प्रक्रिया या अनुषंगाने मार्गदर्शन, जिल्हा निर्यात हब म्हणून विकसित होण्यासाठीची चर्चा, अनुभवकथन, निर्यातवाढीसाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजना व प्रोत्साहने, निर्यात प्रचालन परिषदाबाबत मार्गदर्शन, निर्याती अंतर्गत वित्तीय संस्था/बँका यांची भूमिका व साहाय्य, केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात साहाय्यभूत संस्थाचे सादरीकरण तसेच निर्यातदारांना असणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने चर्चा तसेच तज्ज्ञ व्यक्ती व संस्था यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हयातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, कृषी प्रक्रिया व उत्पादक संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एस. पी. कोलते (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी) यांनी केले आहे.

Web Title: A meeting of exporters will be held in Ratnagiri tomorrow under the chairmanship of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.