शिवसंपर्क अभियानाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:25+5:302021-09-07T04:38:25+5:30
एटीएम बंद रत्नागिरी : शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएममध्ये बहुतांशवेळा पैसे नसतात. अनेकवेळा एटीएम कार्यान्वित नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत ...
एटीएम बंद
रत्नागिरी : शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएममध्ये बहुतांशवेळा पैसे नसतात. अनेकवेळा एटीएम कार्यान्वित नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवसात बॅंका बंद असताना एटीएम सुविधाही बंद असल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
पंचम गट विजेता
दापोली : येथील राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरी व ग्रामीण अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शहरी विभागात दत्त - गिम्हवणे प्रथम, मैत्रेयी - जालगावने व्दितीय तर मृण्मयी - दापोली गटाने तृतीय क्रमांक पटकावला. ग्रामीण विभागात पंचम गटाने पथम, त्रिवेणी गटाने व्दितीय, विमलेश्वर गटाने तृतीय क्रमांक मिळवला.
काैशिक पाल विजेता
दापोली : येथील कृषी महाविद्यालयाच्या जीमखाना विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस पोस्टर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत काैशिक पाल याने प्रथम, यामिनी मते हिने व्दितीय तर अक्षता वेखंडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. जान्हवी गावकर व राहुल मोरे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.