गोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:46 PM2020-01-24T12:46:30+5:302020-01-24T12:48:43+5:30

चिपळूण तालुक्यातील कान्हे पिंपळी येथे गोवंश हत्या प्रकरण घडल्यानंतर येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असताना गुरुवारी अचानक बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Meeting of villagers, all united in killing of cattle | गोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठक

गोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठक

Next
ठळक मुद्देगोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठककारवाई धीम्या गतीने, पूर्व विभागातील ग्रामस्थांनी केला निषेध

चिपळूण : तालुक्यातील कान्हे पिंपळी येथे गोवंश हत्या प्रकरण घडल्यानंतर येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असताना गुरुवारी अचानक बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस व प्रशासन गंभीरपणे लक्ष घालत नसल्याने पूर्व विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पिंपळी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दसपटी विभागातील विविध गावचे ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

या बैठकीत पूर्व विभागातर्फे एक कमिटी गठीत करण्यात आली असून, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी जयवंत शिंदे, चंद्रकांत मांडवकर, दिनेश शिंदे, मयुर खेतले, तानाजी चव्हाण, संदीप शिंदे, संजय गणवे, वीरकुमार कदम, महिला तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे, मनोहर शिंदे, बाबा साळुंखे, अमित कदम, आबाजी शिंदे (तिवरे), राहुल शिंदे (रिक्टोली), महादेव गजमल (तिवडी), वीरकुमार कदम (कळकवणे), सुदेश शिंदे (ओवळी), अनंत राजवीर (पिंपळी), जयवंत शिंदे (पेढांबे), संजय गणवे (वालोटी), राजाभाऊ नारकर (कुंभार्ली), माजी सरपंच नंदा सागवेकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीही आक्रमक

गोवंश हत्याप्रकरणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आक्रमक बनला आहे. चिपळूणला बदनाम करणारी व माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून, जाणीवपूर्वक या घटना सातत्याने घडवल्या जात आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा अध्यक्ष दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम, रोशन दलवाई, रऊफ दलवाई, सतीश खेडेकर, विलास चिपळूणकर, राजन कुडाळकर, मनोज जाधव, विकास गमरे, बारुकू शिंदे, विश्वास कांबळे, बशीर चिकटे आदींनी उपविभगीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Meeting of villagers, all united in killing of cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.