कोकण रेल्वेचा उद्या पुन्हा मेगाब्लॉक
By मनोज मुळ्ये | Published: August 31, 2023 04:50 PM2023-08-31T16:50:38+5:302023-08-31T16:51:01+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पुन्हा एकदा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ...
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पुन्हा एकदा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान २९ ऑगस्ट राेजी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता शुक्रवारी कुमठा ते कुमटा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकमधील कुमठा ते कुंदापुरा सेक्शनच्या दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबर राेजी दुपारी १:१० वाजता ते सायंकाळी ४:१० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे ३१ ऑगस्ट राेजी सुटणारी वेरावल ते तिरुवनंतपुरम दरम्यान धावणारी (१६३३३) एक्स्प्रेस गाडी रोहा ते कुमटा दरम्यान तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे. या गाडीबरोबरच मंगळुरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान १ सप्टेंबर राेजी धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६२०) सुरतकल ते कुंदापुरा स्थानकादरम्यान दीड तास थांबवून ठेवली जाणार आहे.