कोकण मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

By अरुण आडिवरेकर | Published: July 3, 2023 06:35 PM2023-07-03T18:35:07+5:302023-07-03T18:35:33+5:30

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२:२० वाजल्यापासून ...

Megablock on Konkan line will affect train schedule on Friday | कोकण मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

कोकण मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक, रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार 

googlenewsNext

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२:२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येत आहे. वीर ते खेड विभागादरम्यान दुपारी १२:२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३:२० वाजता संपणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची तिरुअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

Web Title: Megablock on Konkan line will affect train schedule on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.