कोकण रेल्वेमार्गावर २३ रोजी मेगाब्लॉक, रेल्वेसेवेवर परिणाम होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:58 AM2023-08-21T11:58:07+5:302023-08-21T11:58:23+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी -वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत तीन तासांचा ...
रत्नागिरी : रत्नागिरी-वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या मेगाब्लाॅकमुळे रेल्वेसेवेवर परिणाम होणार आहे.
रत्नागिरी-वैभववाडी राेड दरम्यान हाेणाऱ्या मेगाब्लाॅकमुळे गाडी क्र. ११००३ दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा २३ राेजी सुरू हाेणारा प्रवास रोहा - रत्नागिरी विभागादरम्यान २:३० तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचा २२ ऑगस्ट राेजी सुरू हाेणारा प्रवास उडुपी - कणकवली विभागादरम्यान ३ वाजता नियमित करण्यात येणार आहे.
तसेच गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा जं. गाडीचा २३ ऑगस्ट रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड - कणकवली विभागादरम्यान ३० मिनिटांनी नियमित केला जाईल.