‘रंग जीवनाचे’ कार्यक्रमात सुनील कांबळे यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:08+5:302021-04-22T04:32:08+5:30

रत्नागिरी : आधार समाजसेवी संस्था रत्नागिरी आयोजित ‘रंग जीवनाचे’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक रविवारी सायंकाळी ५ वाजता लेखक, कवी, सामाजिक ...

Memories of Sunil Kamble in the program 'Rang Jeevanache' | ‘रंग जीवनाचे’ कार्यक्रमात सुनील कांबळे यांच्या आठवणी

‘रंग जीवनाचे’ कार्यक्रमात सुनील कांबळे यांच्या आठवणी

Next

रत्नागिरी : आधार समाजसेवी संस्था रत्नागिरी आयोजित ‘रंग जीवनाचे’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक रविवारी

सायंकाळी ५ वाजता लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या

आठवणीतील गोष्टींवर चर्चा, गप्पा टप्पा व बरेच काही असा कार्यक्रम झूम ॲपवर ऑनलाईन सादर होत आहे.

सुनील कांबळे यांच्या जीवनात घडलेले छोटे छोटे प्रसंग व त्यातून मिळालेली शिकवण यावर ही चर्चा आहे.

कोरोना व लॉकडाऊनचा लोकांच्या मनावरील ताण कमी व्हावा व लोकांनी मनसोक्त संवाद साधून मन मोकळे करावे यासाठी हा ऑनलाईन उपकम आयोजित केला आहे.

सुनील कांबळे यांच्या आठवणींवर गेल्या दोन आठवड्यांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. नळावरील भांडण व न

मोजलेले पैसे या गोष्टी मागील दोन रविवारी चर्चेला होत्या. सर्वप्रथम सुनील कांबळे यांच्याकडून

प्रत्यक्ष गोष्ट वाचली जाते व त्यानंतर लोकांना त्यांच्या शंका व मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन

केले जाते तसेच आपलेही अनुभव सांगण्यास प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद

मिळत आहे. या कार्यक्रमाचे निवेदन येथील निरीक्षण गृहातील शिक्षक विनोद पवार यांनी केले आहे.

या बातमीसाठी २१ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये माहेर नावाने फोटो आहेत.

Web Title: Memories of Sunil Kamble in the program 'Rang Jeevanache'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.