विनयभंगप्रकरणी मर्चंडेंना जामीन, खेडमधील प्रकार, तक्रार खोटी असल्याचा पीडित मुलीच्या आईचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:43 PM2017-12-16T16:43:43+5:302017-12-16T16:47:54+5:30
विनयभंग प्रकरणी अटक झालेल्या दिलीप पांडुरंग मर्चंडे यांना खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विनयभंगाची ही तक्रार खोटी आहे, असे पीडित मुलीच्या आईनेच न्यायालयासमोर सांगितल्याने न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन मंजूर केला.
खेड : विनयभंग प्रकरणी अटक झालेल्या दिलीप पांडुरंग मर्चंडे यांना खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विनयभंगाची ही तक्रार खोटी आहे, असे पीडित मुलीच्या आईनेच न्यायालयासमोर सांगितल्याने न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन मंजूर केला.
गेले काही दिवस खेडमध्ये हा विषय सर्वाधिक चर्चेचा झाला आहे. त्यामुळे जामीन अर्जावर काय निकाल दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल केली जात असताना पीडित मुलीची आई तेथे हजर नव्हती, ही बाबही न्यायालयाने महत्त्वाची मानली आहे.
विनयभंगाची तक्रार पूर्णत: खोटी असून आपल्या मुलीवर तिचा मामा, मावशी, आजोबा यांनी दबाव टाकून ही तक्रार केली असल्याचे तसेच आपण या तिघांविरूद्ध खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असल्याचे पीडित मुलीच्या आईचे म्हणणे आहे. त्यांनी ते प्रसारमाध्यमांसमोरही मांडले आहे.
आरोपीच्या जामीन अर्जावर खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. फिर्यादीची आई घरी नसताना परस्पर फिर्यादीला पोलीस ठाण्यात नेऊन मामा, मावशी, आजोबा यांनी धमकावून तक्रार द्यायला लावल्याचे फिर्यादी अल्पवयीन मुलीनेही न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे न्यायालयाने मर्चंडे यांचा मंजूर केला.
जामीनासाठी महत्त्वाचे ठरलेले मुद्दे
- फिर्यादीची तक्रार देताना फिर्यादीची आई हजर नव्हती.
- पोलिसांनी सदर मुलीची तक्रार घेण्यासाठी रात्रीचे २ वाजवले, पण आई कुठे
आहे, याची विचारणासुद्धा केली नाही.
- फिर्यादीच्या आईने मामा, मावशी व आजोबा यांच्या विरुद्ध पोलीस स्थानकात
तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्या तक्रारीचा उल्लेख करणे न्यायालयात टाळले.
- फिर्यादी मुलीच्या आईकडून मामा, आजोबा व मावशी यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप.
- आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद