‘करा योग - पळवा रोग’चा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:36+5:302021-06-23T04:21:36+5:30
असगोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदूर नं.१ शाळेत जागतिक योग दिन ऑनलाईन ...
असगोली :
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा वेलदूर नं.१ शाळेत जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘करा याेग - पळवा राेग’चा संदेश दिला़
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक गणेश विचारे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व व कोरोना काळात रोगाशी लढण्यासाठी योगाची मिळणारी साथ याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेचे पदवीधर शिक्षक मंदार कानडे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रकार ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नसून सुद्धा कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून वाडीनुसार गट करून योगासनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची संकल्पना सहकारी शिक्षिका सुरेखा उडान यांनी मांडली.
या उपक्रमाला केंद्रप्रमुख अशोक गावणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले़ तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सुरेखा उडान व स्नेहल वेल्हाळ यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली.
-----------------------
गुहागर तालुक्यातील वेलदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी याेग दिनानिमित्त याेगासने केली़