पथनाट्यातून झाडे लावण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:29 AM2021-03-28T04:29:24+5:302021-03-28T04:29:24+5:30

अडरे : ग्लोबल वॉर्मिंग व बदललेले हवामान यामुळे भविष्यात झाडे लावणे काळाची गरज आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ असा ...

The message of planting trees through street plays | पथनाट्यातून झाडे लावण्याचा संदेश

पथनाट्यातून झाडे लावण्याचा संदेश

Next

अडरे : ग्लोबल वॉर्मिंग व बदललेले हवामान यामुळे भविष्यात झाडे लावणे काळाची गरज आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ असा संदेश देत साने गुरुजी उद्यानात नुकतेच नगर परिषदेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत पथनाट्य सादर झाले.

यावेळी अभय दांडेकर यांनी हे पथनाट्य सादर केले. त्यांना पेठमाप येथील रवींद्र कपडेकर यांनी पखवाज साथ दिली. माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत नगर परिषदेने आतापर्यंत सायकल रॅली, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड, वृक्षवाटप असे विविध कार्यक्रम केले. शहरात मोजक्या ठिकाणी फलक लावले. ऊर्जा स्रोतांचा वापर करून प्रदूषण टाळण्यासाठी मोफत चार्जिंग सेंटर उभारणी आदी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सर्व कार्यक्रमांना नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, बांधकाम सभापती मनोज शिंदे, पाणीपुरवठा सभापती बिलाल पालकर, शिक्षण सभापती सफा गोठे, महिला व बालकल्याण सभापती सुरय्या फकीर, समाज कल्याण सभापती उमेश सकपाळ व सर्व नगरसेवक, तसेच उद्यानप्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते.

Web Title: The message of planting trees through street plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.