मंडणगड तालुक्यातील ५०८ नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:12+5:302021-05-17T04:30:12+5:30

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानातून तालुका सावरत असतानाच तौउते चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मंडणगड तालुक्याला फारसा झटका बसणार ...

Migration of 508 citizens of Mandangad taluka | मंडणगड तालुक्यातील ५०८ नागरिकांचे स्थलांतर

मंडणगड तालुक्यातील ५०८ नागरिकांचे स्थलांतर

Next

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानातून तालुका सावरत असतानाच तौउते चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मंडणगड तालुक्याला फारसा झटका बसणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील किनारीपट्टीसह गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच धाेकादायक ५०८ घरांतील नागरिकांचे पक्क्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे़

तालुक्यातील वेळास, बाणकोट ही गावे याचबरोबर सावित्री नदीलगतची वाल्मीकीनगर, वेसवी, उमरोली, शिपोळे या गावांना मागील वर्षी वादळाचा सर्वाधिक फटका बसला हाेता, तसेच समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या कांटे, केंगवल, रानवली, गुढेघर या गावांतही प्रशासनाने जागृती केली आहे. तालुक्यातील वातावरणात बदल झाला असून, दोन दिवसांत ढगाळ वातावरण असून, तुरळक पाऊस पडत आहे. बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता हिंमतगड किल्ल्याच्या वरच्या पठारावर असलेल्या गुढेघर, कंटा, केंगवळ, बलदेवाडी येथे जाऊन बैठक घेऊन सावधानतेचा इशारा दिला आहे. आपत्तीच्या निवारणासाठी गुढेघर मायनिंग कंपनीला विनंती करून एक लोडर आणि जेसीबीची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच तीन कटर चालवणारे वनविभागाचे लोक बाणकोट पोलीस स्थानकात उपस्थित ठेवण्यात आले आहेत.

वादळामुळे रस्ते बंद झाल्यास संपर्क साधण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. किरकोळ पाऊसही पडल्याचे सांगितले.

--------------------

तालुक्यातील पाऊस

तालुक्यात रविवारी सरासरी २७ मिलीमीटर, तर एकूण ९ मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नाेंद करण्यात आली आहे़ मंडणगड ०२ मिलीमीटर, म्हाप्रळ ०६ मिलीमीटर, देव्हारे ०८ मिलीमीटर, वेसवी ११ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Web Title: Migration of 508 citizens of Mandangad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.