कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू चिपळुणातील अलोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 01:45 PM2020-09-01T13:45:30+5:302020-09-01T13:56:29+5:30
कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळी ७.१६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिणेला ६.० किलोमीटरवर होता. मात्र, या भूकंपाचा धक्का सौम्य जाणवला.
चिपळूण : कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळी ७.१६ वाजता २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिणेला ६.० किलोमीटरवर होता. मात्र, या भूकंपाचा धक्का सौम्य जाणवला.
कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. या भूकंपाचे धक्के कधी जाणवत नाहीत तर कधी ते सौम्य प्रकारचे असतात. असे असतानाच मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. याची तीव्रता फार नव्हती. त्यामुळे काही भागात भूकंप जाणवला नाही. या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली ४ किलोमीटर इतकी होती. कोयना धरणापासून या केंद्रबिंदूचे अंतर ८ किलोमीटर लांब होते. या भूकंपाने कोणतीही हानी झालेली नाही.
आतापर्यंत अनेक भूकंपाचे केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात आढळून आले होते. मात्र, या भूकंपाचा केंद्रबिंदू अनेक वर्षानंतर अलोरे परिसरात आढळला आहे. अक्षांश १७त् २५.५'उत्तर व रेखांश ७३त् ३९.३पूर्व दरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.