भंगार व्यवसायातून लाखोंची उलाढाल
By admin | Published: November 19, 2014 09:16 PM2014-11-19T21:16:09+5:302014-11-19T23:17:46+5:30
लांजा तालुका : दिवसाकाठी ५० ते १०० किलोचे भंगार होते गोळा
कुवे : लांजा शहरात सध्या भंगार व्यवसाय तेजीत असून, या भंगारामधून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे दिसत आहे.भंगार म्हटलं की, अनेकजण नाकं मुरडतात. मात्र, या भंगार गोळा करण्याच्या व्यवसायावर तालुक्यातील अनेक परप्रांतीयांचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवशी हे परप्रांतीय कामगार परिसरातून भंगार गोळा करून त्यावर लाखो रूपये कमावत आहेत.या भंगार व्यवसायामध्ये परप्रांतीय मंडळी मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहेत. दिवसाकाठी कित्येक ट्रक भंगार गोळा केले जात असून, या भंगारामधून लाखोंची उलाढाल होताना दिसत आहे. मिळेल त्या ठिकाणी हे व्यावसायिक आपला भंगार व्यवसाय सुरु करतात. भंगारात विविध वस्तू कवडीमोलाच्या रुपाने हे परप्रांतीय खरेदी करतात. मात्र, मोठ्या बाजारपेठांमध्ये ते वाढत्या बाजारभावानुसार विकतात. प्लास्टिक, लोखंड, पत्रा, रद्दी, पुठ्ठे आदी वस्तू ते भंगारामध्ये विकत घेतात.
कोकणात भंगाराचा व्यवसाय म्हटल्यावर तो कमी दर्जाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भंगाराच्या व्यवसायावर परप्रांतीयांनी आपला कब्जा केला आहे. हे परप्रांतीय बाहेरुन येऊन घरोघरी हातगाड्या फिरवत भंगार गोळा करण्याचा धंदा करतात. या भंगारासाठी कांदा, बटाटा तर कोणी भांडीदेखील भंगाराच्या बदल्यात देऊन हा व्यवसाय करतात. यामध्ये दिवसाकाठी ५० ते १०० किलो भंगार हे परप्रांतीय गोळा करतात. हे भंगार एकत्र करुन मग ती टनामध्ये भरुन वाढत्या बाजारभावावेळी बाहेर पाठवले जाते. यामधून लाखोंची उलाढाल होते. (वार्ताहर)
लांजात भंगार व्यवसाय तेजीत.
भंगारमधून दिवसाकाठी लाखोची उलाढाल.
या व्यवसायात परप्रांतीयांचा अधिक भर.
भंगारातून मिळणाऱ्या लाखोच्या उलाढालीची शासन दरबारी कोणतीही नोंद नाही.