राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:28 PM2020-11-10T15:28:45+5:302020-11-10T15:30:55+5:30

adititatkare, guhagar, dhopawe, ratnagirinews दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलची भांडी आली आहेत. त्यामुळे मातीपासून विविध वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. गुहागर तालुक्यातील धोपावे येथील उद्योजिका रसिका राजन दळी यांच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धावती भेट दिली. राज्यातील या पहिल्या प्रकल्पाचे तटकरे यांनी भरभरून कौतुक करत स्वतः मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला.

Minister of State Aditi Tatkare experienced the joy of making pots from clay | राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद

Next
ठळक मुद्देराज्यमंत्र्यांनाही भांडी बनविण्याचा मोहधोपवेच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला आदिती तटकरे यांची भेट

असगोली : दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलची भांडी आली आहेत. त्यामुळे मातीपासून विविध वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. गुहागर तालुक्यातील धोपावे येथील उद्योजिका रसिका राजन दळी यांच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धावती भेट दिली. राज्यातील या पहिल्या प्रकल्पाचे तटकरे यांनी भरभरून कौतुक करत स्वतः मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला.

गुहागर तालुक्यातील धोपावे येथील कृपा औषधाचे उद्योजक राजन दळी व रसिका दळी या दाम्पत्याने दिवाळीतील अभ्यंगस्नान साहित्य, इको-फ्रेंडली आधुनिक गुढी व अन्य भेटवस्तूंच्या यशस्वी प्रयोगानंतर काही वर्षापूर्वी मातीपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंना आधुनिकतेची जोड देत तयार केलेल्या वस्तू स्टॉल बरोबरच बिग बाजार आणि सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत.

राज्यमंत्री तटकरे यांना खादी ग्रामोद्योगच्या प्रधानमंत्री योजनेच्या पोर्टलवर रसिका दळी यांच्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या उद्योगाची माहिती मिळाली होती. त्याचवेळी राज्यातील या पहिल्या प्रकल्पाला भेट देण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या तटकरे यांनी वेळात वेळ काढून या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी रसिका दळी यांनी त्यांना मातीच्या कुंडीत लावलेले वृक्षाचे रोप देऊन स्वागत केले.

दरम्यान, आदिती तटकरे यांनी प्रकल्पाची पाहणी करताना बारकाईने काम करणाऱ्या महिलांकडून प्रत्येक गोष्टी जाणून घेत होत्या. तसेच मातीची भांडी बनवणार्‍या एका मशीनवर चक्क स्वतः हातात माती घेऊन भांडी तयार करण्याचा अनुभव घेतला.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, उद्योजक राजन दळी, तहसीलदार लता धोत्रे, अजय बिरवटकर, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी राजा आरेकर, किरण खरे, उमेश भोसले, प्रकाश रहाटे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, धोपावे सरपंच सदानंद पवार उपस्थित होते.

मातीला आकार

प्रकल्पात तयार केले जाणारे दही पॉट, कपबशी, ग्लास, पाण्याची बॉटल, कॉपी मग, तांब्याचा पेला, वॉलपीस, पेन स्टॅन्ड यांसारख्या सुमारे ६० वस्तू रसिका दळी दाखवल्या. या प्रकल्पात स्थानिक महिला मातीला आधुनिक पद्धतीने आकार देत वस्तू घडवत असल्याची माहिती दिली.

नक्कीच मदत करू

लहान प्रकल्पातूनच कोकण समृद्ध होऊ शकतो. हा प्रकल्प प्रदूषणविरहीत आणि स्थानिकांच्या हाताला काम देणारा असल्याने भविष्यात या प्रकल्पासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास उद्योग खाते नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही तटकरेंनी दिली.

Web Title: Minister of State Aditi Tatkare experienced the joy of making pots from clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.