कर्ली गावातील रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:18 AM2021-03-30T04:18:17+5:302021-03-30T04:18:17+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. रस्त्यावर आलेली ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. रस्त्यावर आलेली खडी, उखडलेला रस्ता तसेच खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करण्याची वेळ आली आहे.
देवरुख - पांगरी - रत्नागिरी या मार्गाला हा कर्ली रस्ता जोडला गेला आहे. हा ग्रामीण मार्ग असून, सुमारे अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावर हा मार्ग अक्षरशः दयनीय झाला आहे. परिणामी वाहन चालकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. तर गावातील प्रवाशांना खड्डयांमुळे दररोज धक्के खात प्रवास करावा लागत आहे. मार्गावर बारीक खडी वर आल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना धोकादायक बनले आहे. मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांना डाेळ्याचे आजारही हाेऊ लागले आहेत. या मार्गाचे डांबरीकरण करून रस्ता खड्डे मुक्त करावा, अशी मागणी कर्ली ग्रामस्थांनी केली आहे.