खासदारांकडून जनतेची दिशाभूल

By admin | Published: October 6, 2016 10:56 PM2016-10-06T22:56:29+5:302016-10-07T00:15:30+5:30

नीलेश राणे : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून पत्रकार परिषदेत टीकास्त्र

The misguided people of the MPs | खासदारांकडून जनतेची दिशाभूल

खासदारांकडून जनतेची दिशाभूल

Next

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या थेट नगराध्यक्षपदासाठी आता खऱ्या अर्थाने राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी घमासान सुरू झाले आहे. आपल्याच पक्षातील इच्छुक प्रतिस्पर्ध्यांना लोळवून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आखाड्यात उतरण्याचा ‘करिश्मा’ इच्छुक उमेदवारांना करावा लागणार आहे. पक्षाच्या वरिष्ठांची मनधरणी सुरू झाली आहे. पक्षांतर्गत निवड चाचणीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले. राजापूर व खेडचे नगराध्यक्षपद इतर मागास वर्गासाठी आरक्षित झाले आहे, तर चिपळूणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी थेट नगराध्यक्ष निवडणूक होणार असली तरी रत्नागिरी व चिपळूणमध्येच या उमेदवारीवरून ‘पक्षांतर्गत धूमशान’ होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेत युती तुटल्याने सेना, भाजप यावेळी आमने - सामने उभी ठाकणार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत सेनेतर्फे बंड्या साळवी यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळीच वरिष्ठांनी शब्द दिल्याची चर्चा आहे. सेनेतून खासदार विनायक राऊत यांचे स्वीय सहायक व नगरसेवक राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची नावेही जोरदार चर्चेत आहेत. २००० साली थेट नगराध्यक्ष असलेले उमेश शेट्ये यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या विरोधात सेनेकडून सक्षम उमेदवार दिला जाण्याची चर्चा रंगली आहे. या इच्छुकांच्या उमेदवारीसाठी त्यांचे गॉडफादर कामाला लागले आहेत. रत्नागिरीतून भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
चिपळूणच्या थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे रिहाना बिजले, शिल्पा सप्रे, अदिती देशपांडे, रुक्सार अलवी, शिवसेनेतर्फे माधुरी पोटे, सुचित्रा खरे, रश्मी खरे यांची नावे चर्चेत आहेत, तर कॉँग्रेसकडून हेमलता बुरटे, गौरी रेळेकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये सध्या कोणीही इच्छुक नाही. खेडमध्ये नगराध्यक्ष उमेदवारीसाठी मनसेतर्फे वैभव खेडेकरांचे नाव निश्चित असून, मनसेप्रमुख राज ठाकरेंकडून आशीर्वाद मिळण्याची औपचारिकता बाकी आहे. सेनेत नागेश तोडकरी, बिपीन पाटणे व अरविंद तोडकरी यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली असून, मंत्री रामदास कदमांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत. राजापूरमध्ये सेनेतर्फे अभय मेळेकर, रवींद्र बावधनकर, कॉँग्रेसतर्फे जमीर खलिपे, भाजपतर्फे शीतल पटेल यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.


उमेदवारीसाठी मुंबई फेऱ्या सुरू
आरक्षण सोडत झाल्यानंतर आपल्यालाच थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीसाठी व त्यांच्याकडून उमेदवारीसाठी शिफारस व्हावी, यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांच्या मुंबई फेऱ्या सुरू झाल्या आहेत. आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी इच्छुकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात असून, भेटीबाबत गुप्तताही पाळली जात आहे.

Web Title: The misguided people of the MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.