आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा 'एसीबी'कडून चौकशी
By मनोज मुळ्ये | Published: March 4, 2024 12:51 PM2024-03-04T12:51:10+5:302024-03-04T12:52:21+5:30
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी ...
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यारत्नागिरी कार्यालयात चौकशी होणार आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबालाही उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
जानेवारी २०२४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेराजन साळवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देताना दिलेल्या निर्देशानुसार, आज साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहतील. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार आहेत.
राजन साळवी यांची पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी झाली. आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला १ मार्चला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस बजावण्यात आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसद्वारे देण्यात आल्या होत्या.
अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.