hanuman chalisa: रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:40 PM2022-05-04T12:40:06+5:302022-05-04T13:46:34+5:30
कायदा व सुव्यवस्थेला बाधा पाेहाेचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम राेखला.
रत्नागिरी : शहरातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रम रत्नागिरी शहर पाेलिसांनी उधळून लावला. हनुमान चालिसा पठणासाठी जमलेल्या मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेऊन कार्यक्रमाला अटकाव केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भाेंगे ३ मे पर्यंत खाली उतरवण्याचे आवाहन केले आहे. हे भाेंगे खाली उतरवले नाही तर ३ तारखेपासून जिथे भाेंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लावा असेही आदेश दिले. मात्र, ३ मे राेजी रमजान ईदमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला हाेता. पण, आज, बुधवार ४ मेपासून सर्वत्र हनुमान चालिसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयाेजन करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी या कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे.
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात बुधवारी दुपारी १२ वाजता हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. याची माहिती रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी यांना मिळताच ते कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. या पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरात मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पाेहाेचू नये यासाठी पाेलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम राेखला.
त्यानंतर पाेलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रुपेश सावंत, अमाेल श्रीनाथ यांच्यासह ६ ते ७ जणांना घटनास्थळावरुन अटक करुन पाेलीस स्थानकात आणले आहे.
रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात #RajThackeray#HanumanChalisaRowpic.twitter.com/rPDPK2tEA8
— Lokmat (@lokmat) May 4, 2022