मनसेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:57+5:302021-08-27T04:33:57+5:30

अडरे : महापूर ओसरल्यानंतर येथील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून मदत आली. यामध्ये मनसेच्या नेत्यांनीदेखील चिपळुणात धाव घेत तालुकाध्यक्ष संतोष नलावडे ...

MNS extends helping hand to flood victims | मनसेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

मनसेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

Next

अडरे : महापूर ओसरल्यानंतर येथील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून मदत आली. यामध्ये मनसेच्या नेत्यांनीदेखील चिपळुणात धाव घेत तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्यासमवेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटसह कपडे, शेगडी, भांडी तसेच औषधांचे वितरण करून दिलासा दिला.

चिपळुणातील पूरग्रस्तांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या नेत्यांनी मदतीचा हात दिला. पूर ओसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसेसह अन्य पक्षांनी तसेच सामाजिक, स्वयंसेवी संस्था व दानशूर आणि मदतीचा ओघ सुरू केला. यामध्ये मनसेही मागे राहिली नाही. माजी आमदार नितीन सरदेसाई, नेते शिरीष सावंत, खेडचे नगराध्यक्ष व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे, सत्यवान दळवी, आमदार राजू पाटील, संदीप चव्हाण, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, विश्वजित डोलम, प्रियांका शृंगारे, मनसेचे कामगार अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, लीना नांदगावकर, दिलीप पाटील, प्रशांत कदम, बावा कदम, प्रशांत शिंदे, सुशांत माळवंदे, मनीष पाथरे, अमोल साळुंखे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चिपळुणात पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या कीटसह अन्य साहित्याचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.

मजरेकाशी येथील पारकर कुटुंबीयांचे घर कोसळले असल्याने या कुटुंबीयांना घर बांधून दिले जाणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिली. मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, शहराध्यक्ष गणेश भोंदे, मनविसे तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा शोभा पावसकर, उपशहराध्यक्षा, शहराध्यक्षा वृषाली सावंत, युवती तालुकाध्यक्ष अस्मिता पेढांबकर, मनविसे शहराध्यक्ष गुरू पाटील यांनी या उपक्रमात सहभाग घेतला हाेता.

Web Title: MNS extends helping hand to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.