मनसेतर्फे पाचल विभागातील पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:33+5:302021-08-12T04:35:33+5:30
पाचल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोकणातील आपदग्रस्तांना गावा-गावात जाऊन मदत करण्याचे ...
पाचल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोकणातील आपदग्रस्तांना गावा-गावात जाऊन मदत करण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली पाचल परिसरात विविध प्रकारच्या जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुंबईतील मनसेचे शाखा अध्यक्ष संजय बन्सी रणदिवे, गणेश हिवाळकर, उपशाखा अध्यक्ष राधे यादव, मंगेश पाटील, शांताराम दळवी, अनिल साबळे, प्रवीण पड्याळ, देवराज, श्रीकांत कोयंडे, जितेंद्र धुरी, शेखर जोशी उपस्थित हाेते. पाचल विभागात काजिर्डा, रायपाटण, करक या गावात पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. घरे, घरातील धान्य, जनावरे, शेती पुरामुळे वाहून गेली होती. या पुरात अनेकांचे संसार देखील वाहून गेले. अशा या परिस्थितीत मनसेच्यावतीने हे वाटप करण्यात आले. काजिर्डा, करक, रायपाटण गावांतील सुमारे ४०० कुटुंबांना या मदतीचा लाभ देण्यात आला.