मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:07 PM2022-05-05T12:07:09+5:302022-05-05T12:08:06+5:30

मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे.

MNS Konkan divisional general secretary Vaibhav Khedekar threatened to kill | मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. धमकी देणारा फोन हा परदेशातील क्रमांकावरून आल्याचं खेडेकर यांनी सांगितलं.

याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचे म्हणणे आहे.

वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. एखाद आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलने दिलेला झटका यामुळे ते कायम चर्चेत असतात.

मनसेचे पहिले नगराध्यक्ष

खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

नियमबाह्य पद्धतीने देयके प्रदान करणं, मान्यता नसतानाही खासगी वाहनात सरकारी खर्चाने इंधन भरणे, इतिवृत्तांत बदल करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: MNS Konkan divisional general secretary Vaibhav Khedekar threatened to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.