चिपळुणात आजपासून मोबाइल कोरोना टेस्टिंग सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:16+5:302021-04-14T04:29:16+5:30
चिपळूण : शहरात विविध ठिकाणी १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मोबाईल कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू होत असून, या ...
चिपळूण : शहरात विविध ठिकाणी १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मोबाईल कोरोना टेस्टिंग सेंटर सुरू होत असून, या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी यांनी केले आहे.
शहरातील विविध भागांत जनतेच्या सोयीसाठी मोबाइल कोरोना टेस्टिंग सेंटर बुधवारपासून सुरू होणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे. यात आरटीपीसीआर आणि अँटिजन या दोन्ही टेस्ट मोफत होणार आहेत. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत, अशी माहिती मोदी यांनी दिली.
मोबाइल टेस्टिंग सेंटर गरजू नागरिकांना सोयीचे होणार आहे. ज्या नागरिकांना कोरोना तपासणीसाठी सेंटरवर जाता येत नसेल, अशा नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगर परिषदेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आजारी लोक, तसेच अपंग बांधवांना या सुविधेचा अधिक उपयोग होणार आहे.